कृतार्थ करण्या जन्म आपुला
कृतार्थ करण्या जन्म आपुला
नित्य भजा गुरूवरा
स्मरा हो दिगंबरासी स्मरा
स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा
गुरूपदाला करता वंदन
संसाराचे तुटती बंधन
गुरूपदाला करता वंदन
संसाराचे तुटती बंधन
सदैव स्मरूनी दत्तपदाला
ताप भवाचा हरा
स्मरा हो दिगंबरासी स्मरा
स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा
जिथे भक्तिने प्रभूचे गायन
तिथे विराजे अत्रीनंदन
जिथे भक्तिने प्रभूचे गायन
तिथे विराजे अत्रीनंदन
नामामृत हे अखंड सेवुन
नामामृत हे अखंड सेवुन
जीवाला उद्धरा
स्मरा हो दिगंबरासी स्मरा
स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा
ज्ञानभक्तिच्या उजळुनी ज्योती
गुरूनामा~ची गात आरती
ज्ञानभक्तिच्या उजळुनी ज्योती
गुरूनामा~ची गात आरती
सद्भावांच्या भावफुलांनी
पुजन गुरूचे करा
स्मरा हो दिगंबरासी स्मरा
स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा
कृतार्थ करण्या जन्म आपुला
कृतार्थ करण्या जन्म आपुला
नित्य भजा गुरूवरा
स्मरा हो दिगंबरासी स्मरा
स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा
स्मरा हो दिगंबरासी स्मरा
स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा
Lyrics Submitted by Umesh Mangalekar
Lyrics provided by https://damnlyrics.com/