De Maz Aashirwad Ambe

Nehha Rajpal

दे मज आशिर्वाद अंबेँ ॥धृ॥
तुझा ध्वनी हा मंदिरी घुमता ।
आतुरले मन नयनी बघता ॥
सुखवाटे मज त्यात अंबे ।
दे मज आशिर्वाद अंबे ॥१॥
सिँहासना वरी अंबे बैसुनी ।
सांग पुजा ती कशी करु मी ॥
लाऊनी आरती वात ।
अंबे दे मज आशिर्वाद ॥२॥
एका जनार्दनी पुर्ण कृपेने ।
भक्त गर्जती बहु प्रेमाने ॥
ठेवूनी मस्तकी हात अंबे ।
दे मज आशिर्वाद अंबे ॥३॥

Lyrics Submitted by Amol S kharde

Lyrics provided by https://damnlyrics.com/