damnlyrics.com

Sarpa Phanivar Krishna Nachala

सर्प फ़णिवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही

अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नही ॥धृ॥

कलिंदीच्या पत्री होता डोह एक गूढ

त्याच्या विषयी भयतवदंत्या जनी होत्या रुढ

कलिया नामा नाग सकुल त्या जलशयी राही ॥१॥

अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नही ॥धृ॥

बळी भद्रविण कृष्ण एकटा सवंगड्या संगे

मुरली वादन क्रीडततया वनांतरी रंगे

निदाघ समयी चुकल्या कोठे वत्ससह गायी ॥२॥

अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नही ॥धृ॥

त्या गायी तर तृषार्थ होत्या यमुनेवर गेल्या

कळ्या डोहा वरी पोचल्या तृषर्थची मेल्या

धुंडयस्तव त्यास उडाली गोपांची घाई ॥३॥

अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नही ॥धृ॥

गायी पाठी गोपबाळही त्या स्थळी

जे गेले ते कृष्ण सवंगडी नदी तटी मेले

पाठी रखा कृष्ण दुरुन हे मृत्युसत्र पाही ॥४॥

अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नही ॥धृ॥

कास घातली पितांबराची अधर धरी नाती

दंड थोपती बाल मल्ल तो थक्क दिशा होती

सवेग चढला कदंब वृक्षी जळी उडी घेई ॥५॥

अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नही ॥धृ॥

कृष्ण बुडाला ........कृष्ण बुडाला ........

कृष्ण बुडाला ........कृष्ण बुडाला ........ व्रजी वार्ता आली

ऐकाच ती माय यशोदा मुर्छितसी झाली

राम रोहिणी नंदाच्या ही बळनुरले पायी ॥५॥

अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नही ॥धृ॥

आणि अचानक जल पृष्ठावर चमत्कार झाला

सूर्यबिंबसे दिसले श्रीमुख गोप सखा आला

अमृत दर्शन होता उठले वत्स गोप गायी॥६॥

अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नही ॥धृ॥

सर्प फ़णिवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही

अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नही ॥धृ॥.....2x

राधे कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण.........9x ॥

Lyrics Submitted by Sarthak Antarkar

Enjoy the lyrics !!!