Me Fasalo Mhanuni - Salil Kulkarni
| Page format: |
Direct link:
BB code:
Embed:
Me Fasalo Mhanuni Lyrics
मी फसलो म्हणूनी हसू दे वा चिडवू दे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी..
ती ऊन्हे रेशमी होती चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरिया होती, अन् झाड मारवा होते..
मी फसलो म्हणूनी..
ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रुप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही बघ ओंजळ होती ओली..
मी फसलो म्हणूनी..
Lyrics Submitted by Ashish Kene
Enjoy the lyrics !!!