TumcHya Pudhyat Kutate Mi Ha Jvanicha Masala - Shaila Chikhale
| Page format: |
TumcHya Pudhyat Kutate Mi Ha Jvanicha Masala Lyrics
Song :- Tumchya Pudhyat Kutate Mi Ha
Jvanicha Masala
Singer :- Shaila Chikhale
Album :- Mala Gheun Chala
भिर भिर फिरत पाखरावानी
कुठच दाना मिळणा,
अहो ,भरलय कणिस तुमचा बाजुला
कसं तुम्हाला कळना........
काखेत कळसा गावला वळसा कशाला, बोला......
काखेत कळसा गावला वळसा कशाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा,
ज्वानीचा मसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा,
ज्वानीचा मसाला ||१||
जिरं जी जी जी ,हेरं जी जी जी जी
हेरं जी जी जी जी, हेरं जी जी जी जी
वय नुकतंच लागलय सोळा
नका घालूव इतक्यात डोळा,
वय नुकतंच लागलय सोळा
नका घालूव इतक्यात डोळा
जीव धकधक करतोय खुळा
हिरवा गार गार झालाय मळा ,
नका घाबरू पावन भाव लय आलाय ऊसाला ,बोला...
नका घाबरू पावन भाव लय आलाय ऊसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा,
ज्वानीचा मसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा,
ज्वानीचा मसाला ||२||
जिरं जी जी जी ,हेरं जी जी जी जी
हेरं जी जी जी जी, हेरं जी जी जी जी
मला करावं आपली रानी
तुमच्या घरात भरीन पाणी,
असं बघु नका खुळ्या वाणी
माझं बोलणं आणा हो ध्यानी
रात लय झाली हात माझा घ्याओ ऊसाला, घ्याकी.....
रात लय झाली हात माझा घ्याओ ऊसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा,
ज्वानीचा मसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा,
ज्वानीचा मसाला ||३||
जिरं जी जी जी ,हेरं जी जी जी जी
हेरं जी जी जी जी, हेरं जी जी जी जी
तुमची माझी ना वळकना पाळख
तुमी खुशाल घालताय शिट्टी
तुमची माझी ना वळकना पाळख
तुमी खुशाल घालताय शिट्टी
जरा देईन कमरेला झटका,
एका फटक्यात करीन छुट्टी
आव छातीत दम नाही उगाच पिळताय मिशाला, आहा...
आव छातीत दम नाही उगाच पिळताय मिशाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा,
ज्वानीचा मसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा,
ज्वानीचा मसाला ||४||
या देहाची दवलत सारी
आता संभाळु मी कुठवरी
जी जी जी ,हेरं जी जी जी जी
या देहाची दवलत सारी
आता संभाळु मी कुठवरी
तुमची ऐकुण किर्ती भारी ,
मी आलेया तुमच्या दारी
का दाबुन धरतात उगीच आपल्या खिशाला, बोला....
का दाबुन धरतात उगीच आपल्या खिशाला
आता फुकाट वाटते मी हा ज्वानीचा मसाला
आता समद्याना वाटीन मी हा ज्वानीचा मसाला
आता घरात कुटते मी हा ज्वानीचा मसाला ||५||
Aniket.B.Sarwade
Lyrics Submitted by Aniket.B.Sarwade